MPSC Student Suicide | दौंडमध्ये MPSC करणाऱ्या मल्हारी बारवकर या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

| Updated on: Dec 17, 2021 | 11:37 PM

मल्हारी नामदेव बारवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  एमपीएससीच्या परीक्षेचे त्याने तीन पेपर दिले होते.  मल्हारी एमपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करत होता. त्याचे वय अवघे 25 वर्षे होते.

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरची आत्महत्या ताजी असतानाच, एसपीएससीची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा या गावात ही घटना घडली आहे. सदर तरुणाने एमपीएससीची तीन वेळा परीक्षा दिली होती, त्यानंतर त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मल्हारी नामदेव बारवकरची आत्महत्या
मल्हारी नामदेव बारवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  एमपीएससीच्या परीक्षेचे त्याने तीन पेपर दिले होते.  मल्हारी एमपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करत होता. त्याचे वय अवघे 25 वर्षे होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मल्हारी बारवकरचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी पाटस पोलीस स्टेशनला दिली आहे.
Corona Vaccination | लहान मुलांच्या कोवोवॅक्स लसीला WHOची मंजुरी
Special Report | स्थगित 27 % ओबीसी जागांवर 18 जानेवारीला मतदान