भाजपाच्याच मंत्र्याने जमीन हडपली – मलिक
वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचा छापा पडला नसून त्या सर्व अफवा आहेत. उटल तत्कालीन फडणवीस सरकारमधीलच एका मंत्र्यांने जमीन हडपल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान त्यावर पत्रकार परिषद घेत मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचा छापा पडला नसून त्या सर्व अफवा आहेत. उटल तत्कालीन फडणवीस सरकारमधीलच एका मंत्र्यांने जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे.