इंडिया आघाडीमध्ये ‘खर्गें’वर अनेकांचा विश्वास, दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

| Updated on: Dec 20, 2023 | 11:16 AM

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उमेदवार देण्याची चर्चा झाली. याच चर्चेतून मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव पुढे आलंय. ममता बॅनर्जींनी संयोजक पदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव सूचवलं

मुंबई, २० डिसेंबर २०२३ : पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांची आघाडी पहिल्यांदा दिल्लीत एकत्र आली. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उमेदवार देण्याची चर्चा झाली. याच चर्चेतून मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव पुढे आलंय. ममता बॅनर्जींनी संयोजक पदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव सूचवलं तर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून खर्गेंचंच नाव अरविंद केजरीवाल यांनी सूचवलं. मात्र आधी विजय मिळवू नंतरच पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवला जाईल असं खर्गे यांनी म्हटलं. ३१ डिसेंबरपर्यंत इंडिया आघाडीतील घटकपक्षांचं जागा वाटप होईल, हे सूत्रांकडून समजतंय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान मोदी यांचा चेहरा आहे तर इंडिया आघाडीची टक्कर मोदींशीच होणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून नरेंद्र मोदींच्या विरोधात चेहरा द्यावा असं बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत.

Published on: Dec 20, 2023 11:16 AM
विरोधकांवर ‘स्ट्राईक’, तीन दिवसांत १४१ खासदार निलंबित; इतिहासातील मोठी कारवाई
शेतमालाला भाव कधी? कांदा-कापूस-सोयाबीनसाठी विधानभवनावर मोर्चा पण…, मोर्चेकऱ्यांचे आरोप काय?