‘पुरुष वेश्या’… धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना शरद पवारांच्या आमदाराची जीभ घसरली अन्…
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना उत्तम जानकर यांची जीभ घसरली असल्याची पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांची जीभ घसरली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना उत्तम जानकर यांची जीभ घसरली असल्याची पाहायला मिळत आहे. ‘धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची गरज काय? हे राज्य इतकं नैतिक होतं, विलासराव देशमुख असो किंवा आर,आर, पाटील हे चुकीचा शब्द सुद्धा यांच्या नितीमत्तेसाठी पुरेसा होता. पण यांनी तर रानबाजार मांडला आहे’, असं म्हणत उत्तम जानकर यांनी बीडच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, अनेक लोकांचे अनेक आरोप आहे. तरी राजीनामा देत नाही. स्त्री वेश्या असतात माहिती आहे. पण पुरूष वेश्या असू शकतो, अशा पद्धतीचे हे मंत्री असतील आणि ते सरकार चालवत असतील तर या राज्याला काय मिळणार? असा खोचक सवाल उत्तम जानकर यांनी केला आहे. मात्र उत्तम जानकर यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर करत जानकरांवर टीकास्त्र डागलं जात आहे.