Disha Salian : ‘वडिलांचं अफेअर अन्…’, दिशा सालियनच्या मृत्यूचं कारण आलं समोर; क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?
मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून मृत्युसंदर्भातील निष्कर्ष आता समोर आलेत. नोकरीतील डील सोबतच वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियन तणावात होती आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर आलंय.
दिशा सालियांच्या मृत्यूप्रकरणात मालवणी पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट समोर आलाय. ज्यामध्ये दिशाच्या मृत्युच्या कारणाचा निष्कर्ष काढण्यात आलाय. आर्थिक अडचण आणि वडिलांच्या अफेअरचं कारण यामध्ये सांगण्यात आलंय. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. तसंच वडिलांना एका अफेअरमुळे त्यांना सतत पैसे देऊन थकलं होतं. वडिलांच्या विवाहेतर संबंधांबद्दल आणि त्यांना द्यावे लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं मित्रांना देखील सांगितलं होतं. दिशाच्या मैत्रिणीचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता त्यात हेच समोर आलंय. प्रोजेक्टमधलं नुकसान वडिलांच्या अफेअरमुळे द्यावे लागणाऱ्या पैशांमुळे दिशा तणावात होती असं तिनं मित्रांना सांगितलं होतं.
दिशाच्या मृत्युनंतर दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र आणि आई-वडिलांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र आता पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांनीच आदित्य ठाकरेसह, सूरज पांचोली आणि दिनो मोरियासह अनेकांवर आरोप केले आहेत. दिशावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं सतीश सालिया यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. पण आता प्रोजेक्टमधल्या नुकसानीसह वडिलांच्या अफेअरमुळे पैसे द्यावे लागत असल्याने दिशा तणावात होती असं पोलिसांनी म्हटलंय.