Mamata Banerjee | राहुल गांधींच्या क्षमेतवर पुन्हा ममता बॅनर्जींचा सवाल

Mamata Banerjee | राहुल गांधींच्या क्षमेतवर पुन्हा ममता बॅनर्जींचा सवाल

| Updated on: Dec 01, 2021 | 8:27 PM

ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. यावेळी त्यांनी मीडियाशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. एखादा व्यक्ती काहीच करत नसेल आणि तो फक्त परदेशातच राहत असेल तर राजकारण कसं करता येईल? अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्ही फिल्डवर राहिला नाही तर काँग्रेस तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्डवर राहिला तर भाजपचा पराभव होईल, असं ममता दीदी म्हणाल्या. ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. यावेळी त्यांनी मीडियाशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या. तुम्ही काँग्रेसविरोधात का लढत आहात? असा सवाल त्यांना करण्यात आला. काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्याविरोधात लढू शकतात तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीच लागेल, असं त्या म्हणाल्या.

36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 01 December 2021
Breaking | द.आफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून आलेले 6 जण कोरोनाबाधित