कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल, विक्रीसाठी मुदत संपलेले फरसाण?
डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी संकेत तांबे यांनी एका वृद्धाला कचऱ्यातून फरसाणचे पाकिटे वेचताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद करण्याचा प्रयत्न केला.
डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी संकेत तांबे यांनी एका वृद्धाला कचऱ्यातून फरसाणचे पाकिटे वेचताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद करण्याचा प्रयत्न केला. तांबे यांनी वृद्ध इसमाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित वृद्ध काही क्षणातच पसार झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वृद्ध फरसाण विक्रीसाठी घेऊन जात होता की स्वतःसाठी खायला नेत होता? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तसेच अशापद्धतीने कचऱ्यात मुदत संपलेले खाद्यपदार्थ टाकले जात असल्याचे देखील या व्हिडिओमुळे समोर आले आहे. याशिवाय अशाप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील आता केली जात आहे.