Kishori Pednekar | अविघ्न पार्क टॉवरमधील मॅनेजमेंट दोषी : किशोरी पेडणेकर

| Updated on: Oct 22, 2021 | 6:00 PM

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एक जण इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो रहिवासी थेट खाली कोसळल्याची माहिती आहे.

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. जीव वाचवताना एका रहिवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. त्यानंतर, इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते आग प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितलं?

अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. तिथे ठिणगी उडून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतील रहिवासी सांगतात की त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किंगमध्ये ठेवली नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Published on: Oct 22, 2021 05:12 PM
Kirit Somaiya | अपारदर्शकता, सत्तेचा गैरवापर, घोटाळ्याची चौकशी होणार : किरीट सोमय्या
Aslam Shaikh | अविघ्न पार्क आग दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश : अस्लम शेख