आधी भाजपचा प्रचार अन् वंचितकडून मिळालं लोकसभेचं तिकीट, उमेदवारीवरून रंगलंय घमासान
भाजपची बी टीम कोण? यावरून वंचित आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असताना राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दुसरीकडे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी वंचितची भूमिका भाजपच्या फायद्याचा असल्याचा आरोप त्यांनी केलाय
जी व्यक्ती परवा भाजपचा प्रचार करत होती. त्याच व्यक्तिला वंचितनं तिकीट जाहीर केल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. भाजपची बी टीम कोण? यावरून वंचित आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असताना राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दुसरीकडे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी वंचितची भूमिका भाजपच्या फायद्याचा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वंचितने शिरूरमधून मंगलदास बांदल यांना दिलेल्या उमेदवारीवरून चांगलंच घमासान रंगलंय. कुणी या उमेदवारीला योग्य ठरवतंय तर कुणी एका गुंडाचा प्रचार करताना पाहणे हे वेदनादायी असल्याचे म्हटलंय. तर भाजपचा प्रचार करणाऱ्याला वंचितची उमेदवारी का? असा काहींनी प्रश्न केलाय. १ एप्रिलला मंगलदास बांदल पुण्यात भाजपच्या प्रचारात सामील झाले होते. मंचावरचे त्यांचे फोटो सुद्धा समोर आले होते. तर त्याच्या ४८ तासांनंतर बांदल यांना शिरूर लोकसभेतून वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. जाणून घ्या मंगलदास बांदल यांच्याविषयी…