अजित पवारांकडून राष्ट्रवादीचा जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी दादांच्या ‘या’ मोठ्या घोषणा

| Updated on: Nov 06, 2024 | 2:02 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन आठवड्यांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष जनतेला अनेक आश्वासने देत आहेत. यादरम्यानच अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

Follow us on

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांच्याकडून आज बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर करण्यात आला. अजित पवार यांनी सादर केलेल्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. बारामतीने प्रगतीचा आलेख गाठणं हे ३३ वर्षांपासूनच ध्येय आहे, असं म्हणत बारामती मतदारसंघासाठी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांनी आपल्या जाहीरनाम्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. बारामतीत फूड प्रोसेसिंग यूनिटचं नेटवर्क स्थापन करणार, बारामतीत लॉजिस्टिक पार्क उभारणार, बारामतीत कर्करोगावर उपचारासाठी रूग्णालय उभारणार, दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आणि अद्ययावत आरोग्य व्यवस्था निर्माण कऱण्याचा आमचा वादा असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. तर ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देणार, बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंना प्रशिक्षण देणारी संस्था उभारणार, बारामतीला पहिलं सौरउर्जा शहर बनवणार यासह बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचे ध्येय असल्याचेही यावेळी अजित पवारांनी सांगितले.