दिशा सालियन प्रकरणावरून जुंपली, ‘सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला’, अनिल परबांचा मनिषा कायंदेंवर निशाणा

| Updated on: Mar 20, 2025 | 6:05 PM

विधान परिषदमध्ये दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आणला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले.

दिशा सालियन प्रकरणावरून विधान परिषदमध्ये आज चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कांयदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली. दिशा सालियन प्रकरणात न्याय हवा, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली. दरम्यान, सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला, अशी टीका अनिल परब यांनी केली. विधान परिषदमध्ये दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात मनिषा कायंदे यांनी आणला. त्यावर अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. अनिल परब यांनी आमदार मनिषा कायंदे यांचे ट्विट सभागृहात वाचून दाखवले. आदित्य ठाकरे यांना सीआयडीने क्लिनचीट दिल्यानंतर मनिषा कायंदे यांनी ट्विट करत भाजप आणि राणेंवर टीका केली होती. ते ट्विट वाचून दाखवताना परब म्हणाले, मनिषा कायंगे आत्ता वरिष्ठांनी खूश करण्यासाठी आरोप करत आहेत. त्यांची नजर आता उपसभापतिपदावर आहे. त्यांनी सरड्यापेक्षा जास्त रंग बदलला. सरड्याला पण शरम वाटली असेल, असे वक्तव्य करत अनिल परब यांनी मनिषा कायंदे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली.

Published on: Mar 20, 2025 06:03 PM
BIG Breaking Video : राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Ajit Pawar : सध्या आमची परिस्थिती नाही, पण.. ; लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजितदादा स्पष्टच बोलेले