मनिषा कायंदेंचा शिंदे – फडणवीस सरकारला खोचक टोला
"आम्हीच एकमेव हिंदुत्ववादी आहोत, हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची मक्तेदारी आम्हाला मिळाली आहे, असा विचार करून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे."
“आम्हीच एकमेव हिंदुत्ववादी आहोत, हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची मक्तेदारी आम्हाला मिळाली आहे, असा विचार करून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आज शिंदे गटातील आमदार लोकांना धमक्या देत आहेत. नवनीत राणा थेट पोलीस ठाण्यात धिंगाणा घालतात. अशा पद्धतीने हे सरकार चालू आहे”, असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला. शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.