Manoj Jarange Patil : …तर आरक्षण कुणाला द्यायचं? जरांगे यांनी मराठा समाजील तरूणांना काय केलं आवाहन?
VIDEO | मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजानं राज्य सरकारला दिलेलं अल्टिमेटम दोन दिवसानंतर संपणार आहे. दरम्यान, आज जरांगे पाटील समाजाशी चर्चा करून पुढील रणनिती ठरवणार आहे. महाराष्ट्रातील मराठा तरुणांना हात जोडून विनंती करत आत्महत्या करू नका असे म्हटले
जालना, २२ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम अवघ्या काही तासानंतर संपणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज एकत्र येण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची चर्चा करून आंदोलनाची पुढील रणनिती ठरवणार आहे. तर २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा मानसन्मान केला, त्यांना १० दिवस अधिक दिलेत, त्यांनी मराठा समाजाचा मान राखावा, आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांचा मान राखला, सन्मान ठेवला त्यांनी आमचा मान राखावा, गाफिल राहू मराठ्यांचा अवमान करू नये, त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू असे जरांगे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मराठा समाजातील तरूणांना आत्महत्या करू नका, असे आवाहन केले. एकानेही आत्महत्या करू नका. आत्महत्या करायची नाही हे तरुणांनी घराघरात सांगा. आत्महत्या केली तर आरक्षण कुणाला द्यायचं? असा सवाल जरांगेंनी केला.