Manoj Jarange Patil : ‘…नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील’, नाराज झालेल्या भुजबळांना जरांगे पाटलांचा सल्ला

| Updated on: Dec 17, 2024 | 5:35 PM

मंत्रिमंडळात मंत्रिपद हुकल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे, अशातच त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक वार पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे चिन्ह आहेत. मंत्रिमंडळात मंत्रिपद हुकल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे, अशातच त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत निशाणा साधला आहे. ‘दुसऱ्यांना मंत्रिपदं गेल्यामुळे याच्या पोटात दुखायला लागलंय. यालाच पाहिजे सगळं… शरद पवारांनी दिलं तेव्हा चांगलं होतं. पण ती राष्ट्रवादीही मोडली. त्यानंतर अजित पवारांनी मोठं केलं पद दिलं पण आता त्यांची राष्ट्रवादीही मोडायला निघाला.’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले, छगन भुजबळ हुशार आहे जेष्ठ आहे त्यांनीच सर्व व्हायला हवं आता…असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी खोचक टोला लगावला. तर पुढे ते असेही म्हणाले, नाही मिळालं मंत्रिपद आता तर काय नाराज व्हायचं. भुजबळांनी एखादी होडी तयार करून आता समुद्रात मासेमारी करावी, सोप्प काम करावं आणि जास्तच जर येड्यावाणी करायला लागले तर ओबीसी नाराज आहे असं म्हणत राहिले आणि तेच फडणवीसांच्या अंगावर घातलं तर टाकतील तेच जेलमध्ये मग जेलमध्ये कांदे खात बसा, असा खोचक सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 17, 2024 05:35 PM