‘महिलाच्या आडून-लपून…’, मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
महिला कार्यकर्त्याच्या आडून लपून आपल्यावर हल्ला करण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांकडून असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळतंय
जालना, ३ मार्च २०२४ : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. महिला कार्यकर्त्याच्या आडून लपून आपल्यावर हल्ला करण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांकडून असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत असून सरकारने दडपशाही सुरू केली आहे, तीन-चार दिवस बघू…, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला यावेळी दिला आहे. ‘फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून महिला कार्यकर्त्यांच्या आडून लपून… माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे. हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही आणि तुम्हाला हे शोभत नाही’, असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस यांना पुन्हा टार्गेट केले आहे. तर मी हॉस्पिटल मधून बाहेर का आलो? दवाखान्यात ऍडमिट असल्यावर चौकशी होत नाही, लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात, पण मी मुद्दाम SIT च्या चौकशी साठी बाहेर आल्याचे जरांगेंनी म्हटले.