दिवाळीच्या दिवसात जरांगे पाटील घरात नाही, त्यांच्या पत्नीनं काय व्यक्त केली खंत?

| Updated on: Nov 14, 2023 | 11:53 AM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरूणांनी केलेल्या आत्महत्येमुळे दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यंदा जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांकडूनही दिवाळी नाही, असे म्हटले. तर टिव्ही ९ मराठीशी बोलताना काय व्यक्त केली कुटुंबानं खंत? बघा काय म्हणाल्या जरांगेंच्या पत्नी?

जालना, १४ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरूणांनी केलेल्या आत्महत्येमुळे दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यंदा जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांकडूनही दिवाळी नाही, असे म्हटले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत असल्याने त्यांचा अभिमान आहे. पण आम्ही यंदा दिवाळी साजरी करणार नाही. २४ डिसेंबर रोजी जरांगे पाटील घरी येतील तेव्हा आम्ही दिवाळी साजरी करणार. मराठा समाजातील तरूणांनी आत्महत्या केल्याने आम्ही यंदा दिवाळी साजरी करणार नाही, असे जरांगे पाटील यांच्या पत्नीने सांगितले. दिवाळीचा सण हा जरांगे पाटील घरी असावे असे वाटते पण मराठ्यांना आरक्षण मिळालं नसल्याने ते अजून घरी परतले नाही. मात्र ते घरी असते तर आनंद झाला असता, असेही जरांगे पाटील यांच्या पत्नीने म्हणत खंत व्यक्त केली. तर ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण भेटेल आणि वडील घरी येतील त्यावेळी आम्ही मोठी दिवाळी साजरी करू तो दिवस आमचा आनंदोत्सव असेल, असे जरांगे पाटील यांच्या मुलानं म्हटले आहे.

Published on: Nov 14, 2023 11:52 AM