हिमंत असेल तर… छगन भुजबळ यांचं जरांगे पाटील यांना खुलं चॅलेंज काय?

| Updated on: Jan 31, 2024 | 5:57 PM

हिमंत असेल तर मंडल आयोगाला संपवून दाखवा असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिलाय

मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : हिमंत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. हिमंत असेल तर मंडल आयोगाला संपवून दाखवा असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिलाय. ‘कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. त्यांच्या माझ्याकडे सह्या आहेत. मराठ्यांच्या सगसोयरे कायद्याशी जर दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले तर याला प्रत्युत्तर देत छगन भुजबळ म्हणाले, हिमंत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करावी, मंडल आयोग संपवून दाखवावा, असे खुलं चॅलेंजच त्यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे.

Published on: Jan 31, 2024 05:57 PM
मराठा आरक्षणासाठी अनोखा संकल्प, आरक्षण जाहीर होताच केस कापले अन्…
राजधानी दिल्लीत गेल्या 12 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक थंडी, दाट धुक्याचा रेल्वे अन् विमानसेवेला फटका