…तर छगन भुजबळ जीवंत समाधी घेतील काय?, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान कशासाठी?
दारूला हात लावला असेल तर जीवंत समाधी घेणार असल्याचा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आणि माझ्यात जर काही निघालं नाहीतर जीवंत समाधी घ्यावी लागणार आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले आणि त्यांनी भुजबळांना थेट आव्हानच दिले
मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : राजकीय स्वार्थासाठी छगन भुजबळ कुठेही बरळतात, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. तर भुजबळांना दिलेलं आव्हान भुजबळ का स्वीकारत नाही? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दारूला हात लावला असेल तर जीवंत समाधी घेणार असल्याचा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आणि माझ्यात जर काही निघालं नाहीतर जीवंत समाधी घ्यावी लागणार आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले आणि त्यांनी भुजबळांना थेट आव्हानच दिले आहे. ‘मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यात अल्कोहोल असेल तर जीवंत समाधी घेईल. भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी आव्हान दिलं आहे. जास्त घेतल्यामुळे जरांगे दुहेरी भुमिका घेत आहेत असं छगण भुजबळ म्हणाले होते.’
Published on: Dec 25, 2023 04:36 PM