मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ अन् मनोज जरांगे पाटील आमने-सामने, बघा काय झाली खडाजंगी?

| Updated on: Nov 07, 2023 | 10:53 AM

मराठ्यांना सरसकट कुणबीची प्रमाणपत्र देऊ नका, म्हणून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. सरकार मराठ्यांना मागच्या दाराने आरक्षण देऊ पाहत असल्याचा गंभीर आरोपही भुजबळ यांनी केलाय.

Follow us on

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप चांगलाच गाजताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील हे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी सरकारची पाठ काही सोडायला तयार नाही. मात्र इतर कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, असेही ओबीसी आणि इतर काही नेत्यांचे म्हणणं आहे. तर मराठ्यांना सरसकट कुणबीची प्रमाणपत्र देऊ नका, म्हणून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. सरकार मराठ्यांना मागच्या दाराने आरक्षण देऊ पाहत असल्याचा गंभीर आरोपही भुजबळ यांनी केलाय. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा थेट दावा भुजबळ यांनी केला इतकंच नाहीतर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचेही मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. छगन भुजबळ यांनी केलेल्या या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केल्याचे पाहायला मिळाले.