Beed Santosh Deshmukh : ‘आकाचा आका’ सुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धस यांचा वाल्मिक कराडला इशारा
कलम ३०२ मध्ये आकाचा हात आहेच पण आकाने त्याच्या आकाला फोन केला असेल तर तेही ३०२ मध्ये येणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला. खंडणीतून संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे आका म्हणजे वाल्मिक कराड ३०२ चा आरोपी आहे. पण...
पैठणमध्ये बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा निघाला. या मोर्च्यात आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं. कलम ३०२ मध्ये आकाचा हात आहेच पण आकाने त्याच्या आकाला फोन केला असेल तर तेही ३०२ मध्ये येणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला. खंडणीतून संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे आका म्हणजे वाल्मिक कराड ३०२ चा आरोपी आहे. तर आकाने त्याच्या आकाला फोन झाला असेल तर तोही ३०२ च्या लाईनमध्ये येऊ शकतो, असं सुरेश धस म्हणाले. विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. तर धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ ओबीसी नेता लक्ष्मण हाके उतरले आहेत. तर प्रकाश शेंडगे यांनी देखील ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचे म्हटलं आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यासह प्रकाश शेंडगे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा भरकटवण्यासाठी रिचार्जवाले आणले जातायत, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट