म्हातारेकोतारेही उपोषणाला बसणार, कुणाचा मृत्यू झाला तर… मनोज जरांगे यांचा सरकारला गंभीर इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरली आहे. मनोज जरांगे पाटील याने पत्रकार परिषद घेत मराठ्यांना आंदोलनाची दिशा दिली, २४ तारखेपासून रोज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करा, वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं.
मुंबई, २१ फेब्रवारी २०२४ : मराठ्यांना सरकारने १० टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे त्यांची भूमिका मागे घेण्यास तयार नाहीत. आरक्षण अमान्य असल्याचे म्हणत सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे गावे घ्या, अशा मागण्या त्यांनी पुन्हा केल्यात. सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी दोन दिवसांत करा, अन्यथा २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरली आहे. मनोज जरांगे पाटील याने पत्रकार परिषद घेत मराठ्यांना आंदोलनाची दिशा दिली, २४ तारखेपासून रोज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करा, वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं. उपोषणावेळी एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाला तर त्याला सरकारचं जबाबदार असणार…तर मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका…नेमकं कसं असणार आरक्षणाचं आंदोलन बघा व्हिडीओ…