मी जर मेलो तर मला तसंच…. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन काय?
उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधांचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत जास्तच खालावली. आज सकाळी त्यांच्या नकातून रक्तस्त्राव होऊ लागला होता आणि पोटातही दुखू लागलं होतं. असे असतानाही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला
जालना, १४ फेब्रुवारी २०२४ : गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधांचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत जास्तच खालावली. आज सकाळी त्यांच्या नकातून रक्तस्त्राव होऊ लागला होता आणि पोटातही दुखू लागलं होतं. असे असतानाही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मात्र बीड जिल्ह्यातील नारायण गड संस्थानचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांनी आणि संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलचे विनोद चावरे यांनी बळजबरीने सलाईन लावण्यास सांगितले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. या दरम्यान, मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी जर मेलो तर मला तसंच त्यांच्या दारात नेऊन टाका. मुंबईत एकटा जाईन, लवकरत कायद्याची अंमलबजावणी करा असे म्हणत सरकारला धारेवर धरा असं मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे.