Manoj Jarange Patil : मी मरावं वाटतं का? आईला कशाला आणलं? जरांगे पाटलांनी स्टेजवरच कार्यकर्त्याला झापलं

| Updated on: Oct 29, 2023 | 5:22 PM

VIDEO | जालन्यातील अंतरवाली सराटी उपोषणस्थळी आई येताच मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर भडकले, कशाला आणलं आईला? कोण आणतं रे त्यांना? तुम्हाला कोण आणायला सांगतं त्यांना? इकडे ये… इकडे ये. कोण आणायला सांगतं रे तुम्हाला? तुम्हाला अकली नाहीत का? जरांगे पाटील यांनी मराठा कार्यकर्त्यांना स्टेजवर झापलं.

जालना, २९ ऑक्टोबर २०२३ | ‘मी समाजाला मानतो नंतर मी माझ्या कुटुंबाचा. माझ्या कुटुंबानेमध्ये येऊ नये. मी पहिला समाजाचा आहे. जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा’, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. यानंतर उपोषणस्थळी आईला पाहताच ते भडकले म्हणाले, कशाला आणलं आईला? कोण आणतं रे त्यांना? तुम्हाला कोण आणायला सांगतं त्यांना? इकडे ये… इकडे ये. कोण आणायला सांगतं रे तुम्हाला? तुम्हाला अकली नाहीत का? कुटुंब पाहिल्यावर मला त्रास होतो. काय ऐकायचं तुला? व्हय खाली चल. मला किती त्रास होतोय कळत नाही तुम्हाला? असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा कार्यकर्त्यांना स्टेजवर झापलं. पुढे ते असेही म्हणाले तुमचं शहाणपण ऐकायचं का? मला त्रास होत नाही का? मी मरावं वाटतं का तुम्हाला? नालायक आहे का रे तू? सारखं सारखं प्रश्नांची उत्तरं देतो. कुटुंब आणल्यावर मला त्रास होतो. पार जिवाला लागतं माझ्या. तुम्ही बार बार कुटुंब आणून बसविता इथं, असं म्हणत जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 29, 2023 05:22 PM
जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या छावणीत छत्रपती शिवरायांच्या साडे दहा फुटी अश्वारूढ पुतळ्याची स्थापना
सदावर्ते यांना अटक करा अन् चितावणीखोर वक्तव्यामागील चाणक्याचा शोध घ्या, कुणाची आक्रमक मागणी?