जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, ‘या’ जागांवर देणार आपले उमेदवार, विधानसभेसाठी 3 फॉर्म्युले
अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांच्या समोर आपली भूमिका स्पष्ट केले. उमेदवार उभे करायचे की पाडायचे? यातला मध्यबिंदू साधत मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा अखेर राजकीय प्रवेश झाला आहे. सर्व जागा न लढवता जिथे ताकद आहे, तिथं अर्ज भरा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार मराठवाड्यात कोणाचं गणित बिघडवू शकतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उमेदवार उभे करायचे की पाडायचे? यावर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतायतं याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांच्या समोर आपली भूमिका स्पष्ट केले. उमेदवार उभे करायचे की पाडायचे? यातला मध्यबिंदू साधत मनोज जरांगे पाटील यांनी जिथे निवडून येण्याची क्षमता आहे तिथे अपक्ष म्हणून उमेदवार द्या, इतरत्र जे आपल्या मागण्यांशी सहमत आहेत, त्यांना पाठिंबा द्या, असं आवाहन करत अर्ज भरा, अंतिम वेळी अर्ज ठेवायचा की माघारी घ्यायता याचा निर्णय घेऊ, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याशिवाय जे इच्छुक असतील त्यांनीही अर्ज करावे, मात्र समीकरणं न जुळल्यास उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि जर सांगूनही अर्ज मागे घेतला नाही, तर त्याला राजकीय पक्षांची रसद असल्याचे समजलं जाईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.