मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार? विधानसभेसंदर्भात मोठी घोषणा

| Updated on: Oct 20, 2024 | 5:43 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली येथेआपल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला आपली स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर कोणत्या जागेवर आपले उमेदवार जाहीर करणार याची घोषणा केली.

Follow us on

मनोज जरांगे पाटील यांनी आज विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे आपले उमेदवार उतरवणार असल्याची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. ज्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद आहे तिथे विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.जिथे आपले उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे मराठा समाजाचे उमेदवार उभे करु, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे जो आपल्या विचाराचा आहे तिथे लाखभर मतदान देवून त्या उमेदवाराला निवडून द्यायचं, असं जरांगे यांनी स्पष्ट केल आहे. जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जो आपल्याला ५०० रुपयांच्या बॉन्डवर लिहून देईल की, मी तुमच्या सर्व मागण्यांशी सहमत आहे त्याला निवडून देऊ. अन्यथा त्याला पाडू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. यासोबतच कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लिमांची ताकद आहे ते गणित पाहणं गरजेचं आहे. कारण ते समीकरण जुळवणं देखील महत्त्वाचं आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळलं तर अवघड आहे, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.