जरांगे पाटील म्हणाले, ‘२९ सप्टेंबरपासून शेवटचं…’; ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपोषणाचं हत्यार

| Updated on: Aug 30, 2024 | 11:32 AM

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. २९ सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे यांच्या मुलालाही पराभूत करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आणि ठीक एक वर्षभरानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. २९ सप्टेंबरपासून हे मराठा आरक्षणासाठी शेवटचं उपोषण असणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली पण समर्थकांनी उपोषण नको अशा घोषणा दिल्यात. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबीतून आरक्षण द्या, अशी मागणीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे लावून धरली आहे. पण सगेसोयऱे कोर्टात टिकणार नाही, असे स्वतः सरकार म्हणतंय. यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिसवाल करत विचारले, जर सगेसोयऱे कोर्टात टिकणार नव्हतं तर मग अधिसूचना तरी का काढली? मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या मुडमध्ये आलेत. इतकंच नाहीतर यावेळी निवडणुकीला उमेदवार देण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 30, 2024 11:32 AM
शिवरायांच्या शिल्पातील कपाळावर वार? शिल्पकाराची पोस्ट अन् कमेंट वादात, नेमका वाद काय?
गाडी पकडली अन् भकडले, संतोष बांगर यांची RTO अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल