… नाहीतर १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा मोठी घोषणा

| Updated on: Jan 31, 2024 | 11:54 AM

१० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आरक्षणासंदर्भात काढलेल्या सगेसोयऱ्यांवरून सरकारने अधिसूचना जारी केली.

Follow us on

मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : चार दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. वाशीतील आरक्षणाचा मोर्चा माघारी केला. मात्र जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली. १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली. सगेसोयऱ्यांवरून सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करा, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आरक्षणासंदर्भात काढलेल्या सगेसोयऱ्यांवरून सरकारने अधिसूचना जारी केली. यालाच अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोध दर्शविला आहे. मात्र ही अधिसूचना म्हणजे सरसकट मराठा आरक्षण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर मनोज जरांहे पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, तुमच्याच त्यावर सह्या आहेत. आता पुढं बघतो असे म्हणत सरकारलाच पुन्हा इशारा दिलाय. बघा काय दिला मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा…