तर निवडणूक लढवणार, मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा

| Updated on: May 31, 2024 | 3:46 PM

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असे मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात माध्यमांसमोर सांगितले. तर मराठा समाजाकरता सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी येत्या ४ जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही सांगितले

मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं नाही तर विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी घोषणा पुण्यातून मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तर मराठा समाजाकरता सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी येत्या ४ जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही गेल्या काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर सांगितले होते. पुण्यात आज मनोज जरांगे पाटील हजर होते. २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना वॉरंट बजावले होते. याप्रकरणात आज ते पुण्यातील कोर्टात हजर झाले होते. त्यांच्याविरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मोठी घोषणाही केली.

Published on: May 31, 2024 03:46 PM
इतना तो हक्क बनता है बच्चों का… सुप्रिया सुळे यांचा कुणाला खोचक टोला?
मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, कुणाचा गंभीर आरोप?