देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री 3 वाजता फोन; जरांगे यांचा पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Mar 22, 2024 | 2:07 PM

देवेंद्र फडणवीस यांनी आधी रात्री एक वाजता फोन केला. पण तो मी घेतला नाही. फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे रात्री 3 वाजता फडणवीस यांचा फोन घेतला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मध्यरात्री 3 वाजता फोन केला, असा मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी आधी रात्री एक वाजता फोन केला. पण तो मी घेतला नाही. फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे रात्री 3 वाजता फडणवीस यांचा फोन घेतला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ‘फडणवीसांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांचा मला फोन आला होता. गुन्हे मागे घेत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं. फडणवीस माझ्याशी बोलले. आपण काही पोटात ठेवत नसतो’, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमच्या लोकांनी मला मराठ्यांवर गुन्हे दाखल करणं सुरू असल्याचं दाखवलं. एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही, पण मी मात्र समाजाची भूमिका घेऊन जाईल. 24 तारखेला काहीही होऊ शकतं, असा इशाराच त्यांनी दिला.

Published on: Mar 22, 2024 02:07 PM
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवली, काय आहे प्रकरण?
अभिनेता गोविंदानं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार?