‘या’ ठिकाणी 100 टक्के पराभव, हा शब्द… त्यांच्या मतदारसंघात मराठ्यांचं मताधिक्य; जरांगेंनी चॅलेंज देत दिला गंभीर इशारा
मराठा समाजाला विरोध कऱणाऱ्या आमदारांना मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर इशारा दिला आहे. राज्यातील 113 आमदारांना पाडणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील हे अधुनिक काळातील मोहम्मद अली जिन्ना असल्याची टीका केली.
साताऱ्यात असताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील 113 आमदारांना पाडणार असल्याचे चॅलेंज दिलंय. तसंच परळीतून धनंजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजन यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. परळी आणि जामनेरमध्ये मराठा समाजाचं मोठं मताधिक्य असल्याने धनंजय मुंडे आणि गिरीश महाजन कसे निवडून येतात, तेच बघतो असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील हे अधुनिक काळातील मोहम्मद अली जिन्ना असल्याचा हल्लाबोल नितेश राणेंनी केला आहे. या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. बघा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.