मनोज जरांगे पाटील यांच्याकडून छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, ज्या गोरगरिब मराठ्याने तुला मोठं केलं…

| Updated on: Oct 14, 2023 | 3:38 PM

VIDEO | जालन्यातील सभेसाठी सात कोटी खर्च आला, इतका पैसे कुठून आला? असा सवाल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला होता. यावर जरांगे पाटलांनी सडकून प्रत्युत्तर दिलंय. आम्ही १०० एकर जमीन विकत घेतली नाही. सभेसाठी फक्त मैदान भाड्याने घेतलं आहे.

जालन्या, १४ ऑक्टोबर २०२३ | आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही. मलाच टार्गेट करत असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मग आपण त्यांच्यावर बोलायचं बंद केलं पण काल पुन्हा फडफड करायला लागले. काल भुजबळ म्हणाले जालन्यातील सभेसाठी सात कोटी खर्च आला, इतका पैसे कुठून आला? असा सवाल छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना विचारला. यावर जरांगे पाटलांनी सडकून प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, आम्ही १०० एकर जमीन विकत घेतली नाही. सभेसाठी फक्त मैदान भाड्याने घेतलं आहे. इथल्या शेतकऱ्याने ते फुकटं दिलंय. लोक १० रूपयेपण देत नाही म्हणताय, तुला देत नसतील. ज्या गोरगरिब मराठ्याने तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावला, म्हणून तुझ्यावर धाड पडली. गरिबांचे पैसे खाल्ले आणि २ वर्ष जेलमधून बेसन खाऊन आला आणि आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केलाय.

Published on: Oct 14, 2023 03:24 PM
Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर भाजपकडून ट्वीट, देवेंद्र फडणवीस यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ शेअर
BJP नं लावलेली जाती-जातीमधील आग आता पेटायला लागलीये, कुणाची भाजपवर गंभीर टीका