छगन भुजबळ पागल कामातून गेलंय ते… मनोज जरांगे पाटलांकडून एकेरी उल्लेख करत टीकास्त्र
मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना थेट फटकारले आहे. 'त्याच जाऊदे. ते पागल झाले आहेत. त्यांना दुसरं येतंय काय? तू स्वतः साऱ्या दुनियाचं खातो तेव्हा काय? तेव्हा जमतं का?' असा खोचक सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय
जालना, ५ जानेवारी २०२४ : मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या वाढतच जात आहे, असं वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना थेट फटकारले आहे. ‘त्याच जाऊदे. ते पागल झाले आहेत. त्यांना दुसरं येतंय काय? तू स्वतः साऱ्या दुनियाचं खातो तेव्हा काय? तेव्हा जमतं का?’ असा खोचक सवाल मनोज जरांगे पाटील यांनी करत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र केलं. मनोज जरांगे पाटील पुढे असेही म्हणाले की, छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारत जाऊ नका, ते कामातून गेले आहे. त्यांना मराठा समाज महत्त्व देत नसल्याचे म्हणत पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय.