हे सर्व सरकार घडवतंय…मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलाय
गेल्या सहा दिवसांपासून ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात ओबीसी सामाजेच नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसी सामाजेच नेते आग्रही आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील हे असंवैधानिक भाषा वापराय, त्यांचं राज्यात काय षडयंत्र सुरू आहे? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. ओबीसी समाजाचं सुरू असेललं आंदोलन सरकार पुरस्कृत आहे. हे सर्व सरकार घडवून आणतंय असं म्हणत मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर मनोज जरांगे पाटील यांनी हा घणाघाती आरोप केला आहे.
Published on: Jun 19, 2024 04:53 PM