मनोज जरांगे पाटलांच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोन व्ह्यू, मराठ्यांचा लोटला जनसागर

| Updated on: Oct 12, 2024 | 11:49 AM

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील नारायण गड या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत,

आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्री क्षेत्र नारायण गड बीड येथे दसरा मेळावा घेणार आहे. दसरा निमित्त मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या या दसऱ्या मेळाव्याला रात्रीपासून लाखो मराठा बांधव नारायण गडावर जमायाल सुरुवात झाली आहे. तब्बल 200 एकर परिसरात मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे.दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात अनेकदा म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे काही मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? त्या ठिकाणची ड्रोन दृश्य समोर आली आहेत.

Published on: Oct 12, 2024 11:44 AM