आता थेट घोषणा, कामाला लागा… लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 24, 2024 | 6:18 PM

मनोज जरांगे पाटील यांनी वेगळी भूमिका जाहीर केली आहे. प्रत्येक मतदारसंघातील एक अपक्ष उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर प्रत्येक गावा-गावात मराठा समाज बैठका घेणार आणि अहवाल तयार करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आरक्षणावरुन आक्रमक होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत घेतली जात आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी वेगळी भूमिका जाहीर केली आहे. प्रत्येक मतदारसंघातील एक अपक्ष उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर प्रत्येक गावा-गावात मराठा समाज बैठका घेणार आणि अहवाल तयार करणार आहे. यानंतर ३० मार्चपर्यंत मराठा समाज तयार केलेले अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देणार असल्याची माहिती मिळतेय. तर उमेदवार निश्चितीची घोषणा मनोज जरांगे पाटील करणार असल्याचे त्यांनी म्हटलेय. रविवारी अंतरवाली सराटी या गावी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली

Published on: Mar 24, 2024 06:18 PM
शिवतारेंना आम्ही उमेदवारी देणारच नाही, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं वक्तव्य
महादेव जानकर महायुतीत, ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढण्याची शक्यता