मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर…, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा काय?
वर्षभरापासून मराठा समाज आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे. हा सगळा मराठा समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज होणार आहे. शिंदेंना मराठा समाज मानतो. पण आता एकनाथ शिंदे पूर्णपणे मराठा समाजाच्या मनातून उतरणार असल्याचे म्हणत जरांगेंनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांसोबत काही दगाफटका केला तर राज्यातील संपूर्ण मराठा समाज हा एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होणार आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. जालन्यात मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. काही लोकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानं फुकत आहेत. पण जर त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाचा, आंदोलन कर्त्यांचा गेम केला तर त्यांनी तसं करू नये, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माननारा असा मराठा समाज आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरसारखी परिस्थिती घडवून आणायची आहे, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. इतकंच नाहीतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना दंगल करायच्या आहेत, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.