Manoj Jarange Patil : मध्यरात्री कोणत्या मंत्र्याचा फोन?; मनोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट काय?
मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून काल रात्री त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय बघा व्हिडीओ
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून काल रात्री त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. एका मंत्र्याच्या सांगण्यावरून त्यांनी ही सलाईन लावली, असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत काम होत नाही, विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास नाही. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी पाच महिन्यापासून झालेली नाही. एवढा वेळ थोडाच लागतो. आम्ही सलाईन कुणाच्या शब्दाला मान ठेवून लावली ते जाहीरपणे सांगू. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू तर करा. नाही केली तर आम्ही नाव घेऊन सांगू, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे तर आरक्षणाबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल. नाही कळालं तर सलाईन काढून फेकू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असं एका मंत्र्याने रात्री सांगितलं. त्यांच्या शब्दाला मान दिला. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवूच नये का? शेवटी निर्णय घेणारे तेच आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, असं मनोज जरांगे म्हणाले.