शेवट काय होणार, हे कळेल… मनोज जरांगे पाटील यांनी उपचार थांबवले अन् पुन्हा तीव्र उपोषण सुरू

| Updated on: Feb 20, 2024 | 3:11 PM

मराठा समाजाला सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आलं. मात्र त्यांनी हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नसल्याचे म्हणत जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली आहे.

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक आज विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आलं. मात्र त्यांनी हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नसल्याचे म्हणत जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली आहे. यामध्ये मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, हे विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही. या विधेयकाला विरोध करतानाच मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोवर उपचार घेणार नसल्याचे जरांगे म्हटलं आणि उपचार थांबवले. आज जे विधेयक मंजूर झालं, त्याचं आम्ही त्यासाठी आताही स्वागतच करतो. यात काही पोरांचं कल्याण होणार नाही. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे, यावर जरांगे ठाम आहेत.

Published on: Feb 20, 2024 03:11 PM
मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर; राहुल नार्वेकर यांच्याकडून घोषणा
आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का? राज ठाकरे यांचा सरकारलाच थेट सवाल