Manoj Jarange Patil LIVE : मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 01, 2023 | 3:01 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. याबैठकीनंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

Follow us on

जालना, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. दरम्यान आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. याबैठकीत सर्वपक्षीय नेत्याचे मराठा आरक्षणावर एकमत झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ही सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांहे पाटील यांना त्यांचं उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र या मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्या आमरण उपोषणावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार का? हे सांगावे. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.