Manoj Jarange Patil : छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Dec 16, 2024 | 5:20 PM

'मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नाही तो राजकीय प्रश्न आहे. मराठा आराक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही', असं म्हणतं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

नागुपरात काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्या आणि बड्या नेत्यांना डावललं असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये छगन भुजबळ यांचं देखील नाव आहे. दरम्यान, यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नाही तो राजकीय प्रश्न आहे. मराठा आराक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही, असं म्हणतं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, मंत्रिमंडळात स्थान आहे किंवा नाही हा राजकीय विषय आहे तो आरक्षणाचा विषय नाही त्यामुळे आम्हाला त्यात पडायचं नाही पण आरक्षणाचं बोलले तर सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षाही मनोज जरांगे पाटलांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Published on: Dec 16, 2024 05:20 PM