Manoj Jarange : ‘कुत्रे अन् मांजरांवरून जातीय तेढ..’, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरील वादात जरांगे पाटलांचं भाष्य
देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात वाद निर्माण करणाऱ्यांचे फडणवीसांनी कान टोचले.
‘कुत्रे आणि मांजरांवरून जातीय तेढ निर्माण करायचा आहो का?’, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्यांच्या समाधीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या महाराष्ट्रात रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्यांच्या समाधी वाद-विवाद रंगताना दिसताय. अशातच सुरू असलेल्या वादादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले की, संभाजी राजे एकाकी पडले, असे माध्यम म्हणत असतील तर संभाजी राजे कधीही एकाकी पडणार नाहीत. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी संभाजी राजे यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज आपली पहिली प्रतिक्रिया दिली. वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल. कारण या स्मारकाकरीता होळकरांनी त्यावेळी पैसे दिले आहेत. त्यामुळे थेट पुतळा काढण्याबाबत समाजात रोष सुद्धा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.