आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने

| Updated on: Sep 22, 2024 | 11:29 AM

आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांचंही आंदोलन सुरू आहे. मात्र जालन्यातील अंतरवाली सराटीकडे जाणारा मार्ग हाके यांच्या आंदोलन स्थळाच्या समोरून आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने वडीगोद्रीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणामध्ये मराठे नको, या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत. यादरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांचे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. तर अंतरवाली सराटीपासून दीड किलोमीटर अंतरावर वडीगोद्रीत लक्ष्मण हाके तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, वडीगोद्रीवरून जाताना दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. आता संघर्ष टाळण्यासाठी पोलीस बॅरिकेटिंग करून दोन्ही मार्ग वेगळे करून देणार असल्याची माहिती मिळतेय. आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यात चकमक सुरू झाली आहे. लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 22, 2024 11:29 AM