‘फक्त हट्ट धरू नका, एकच वचन द्या’, मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होत आहे. मराठा समाजाकडून भरसभेत वचन घेतलं आणि नंतर आता दाखवतो यांना कचका, असं म्हणत सरकारसह विरोधकांना मोठा इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांचा आज बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे पहिला दसरा मेळावा होत आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेपूर्वीच सरकारसह विरोधकांना मोठा इशारा देत मराठ्यांकडून वचन मागितलं आहे. ‘मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणरा नाही हा गडावरून शब्द देतो. आता हातवर करून सांगा, माझी नजर पुरेल तिथपर्यंत हात वर करून सांगा. आता मग दाखवतो यांना कचका. आता दाखवतो यांना कचका. नाटकं करतात व्हय. करोडोच्या संख्येने समुदाय न्यायासाठी लढत आहे. जो समुदाय न्यायासाठी लढतोय त्यांच्या बाजूने न्याय करणारे लोकं नाहीत’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.