जरांगे पाटलांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे, बीडमधून मराठ्यांना आवाहन; विधानसभेला सगळे आमदार…

| Updated on: Jul 12, 2024 | 10:38 AM

बीड जिल्ह्यातील एकही निवडून देऊ नका, असं म्हणत सर्व आमदारांना पाडण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी बीडमध्ये केलं. मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार घातला. पण मविआचे नेते नाही आले म्हणून काय झालं? सरकारने सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले.

Follow us on

मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये रॅली झाली. या रॅलीद्वारे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला. मुंडेंसह सर्व २८८ आमदारांना पाडा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. बीड जिल्ह्यातील एकही निवडून देऊ नका, असं म्हणत सर्व आमदारांना पाडण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी बीडमध्ये केलं. मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार घातला. पण मविआचे नेते नाही आले म्हणून काय झालं? सरकारने सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले. लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळावरून मंत्री छगन भुजबळ यांनी शेअरोशायरीतून निशाणा साधला होता. त्यावरून जरांगेंनी भुजबळांना उत्तर दिलंय. तलवार दाखवेंगे काय, दाखवतो काय औकात तुझी? असा पलटवारच जरांगे पाटील यांनी केला.