मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली, स्टेजवर उभं राहताच कोसळले अन्…

| Updated on: Oct 30, 2023 | 3:30 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत आज सलग सहाव्या दिवशी आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी बोलताही येत नाहीये. जरांगे पाटील स्टेजवर उभं राहताना कोसळले आणि आंदोलकांनी एकच गदारोळ केला

जालना, ३० ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत आज सलग सहाव्या दिवशी आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. दरम्यान, पोटात काही अन्न आणि पाणी नसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. त्यामुळे समस्त ग्रामस्त चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, गावकऱ्यांकडून त्यांना पाणी पिण्याची वारंवार विनंती केली जात आहे. दरम्यान, आज दुपारी २ वाजता माध्यमांशी संवाद साधणार त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील हे स्टेजवर धाडकन कोसळले. त्यामुळे आंदोलकांनी पाटील यांनी पाणी प्या.. तुम्हाला पाणी प्यावंच लागेल. अशी वारंवार विनंती सुरूच ठेवली. जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली असली तरी त्यांनी त्यांच्यावरील वैदकीय उपचारांना नकार दिला आहे. त्यामुळे सरकारनेही त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यास आणि पाणी पिण्यासह तब्येतीची काळजी घेण्यास विनंती केली आहे.

Published on: Oct 30, 2023 03:30 PM
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलं आवाहन?
मराठा आरक्षणाची घोषणा कधीही होऊ शकते, शिंदे सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य