Manoj Jarange Patil यांची प्रकृती खालावली; जालन्यातून थेट संभाजीनगरमध्ये उपचार, नेमकं झालं काय?

| Updated on: Sep 17, 2023 | 2:56 PM

VIDEO | जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात १७ दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, जालन्यातून थेट संभाजीनगरमधील गॅलेक्सी रूग्णालयात उपचारासाठी दाखल, नेमकं काय झालं?

Follow us on

संभाजीनगर, १७ सप्टेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकार मान्य करत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या १७ दिवस उपोषण केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जालन्यात आंदोलनस्थळी उपचार घेतल्यानंतर आता त्यांना संभाजीनगरमधील गॅलेक्सी रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी मनोज पाटील यांना उपचार दिले जाणार आहेत तर काही चाचण्या देखील करण्यात येणार आहे. जरांगे यांना अचनाक अशक्तपणा वाटू लागला. त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेने त्यांना संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. उपचार घेण्याबाबतीत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. उपचार घेतल्यानंतर परत मी उपोषणस्थळी जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितले आहे.