Manoj Jarag Patil : उपोषणाचा चौथा दिवस… डॉक्टरांचं पथक दाखल; जरांगे पाटलांना नेमकं झालंय काय?

| Updated on: Jun 11, 2024 | 12:40 PM

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे.

Follow us on

मनोज जरांगे पाटील हे सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 8 जूनपासून उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. चार दिवस कोणत्याही प्रकारचं अन्न-पाणी ग्रहण केले नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे जालन्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे. डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्यास नकार दिला आहे.