मी बधिर डोक्याचा आहे का? मनोज जरांगे पाटील सरकारच भडकले, म्हणाले…
मराठा आरक्षणासंदर्भातील एक मसुदा घेऊन आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील नेते बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील नेत्यांमध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या काय झाली चर्चा? कोणता मसुदा आज बच्चू कडू यांनी जरांगेना दिला?
जालना, १७ जानेवारी २०२४ : गेल्या कित्येक दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट मराठा आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे. आता तर त्यांनी थेट २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील एक मसुदा घेऊन आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील नेते बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले होते. यासंदर्भात मनोज जरांगे यांनी बोलताना म्हटले की, त्या मसुद्यात वेगळं असं काहीच नव्हतं फक्त चर्चा, घोळ घालणे आणि वेळ मारून नेणे. कालच व्याख्या दिली होती की, सगसोयरे म्हणजे काय? दीड महिन्यांपूर्वीदेखील तीच व्याख्या सरकारला सांगितली होती. पण जी व्याख्या लिहून दिली होती ती सरकारने त्या मसुद्यात टाकली नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरच आरोप केलाय. बघा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?