Manoj Jarange patil Live : जरांगे पाटील यांची राजगुरुनगरमध्ये सभा, लाखो मराठा बांधव उपस्थित

| Updated on: Oct 20, 2023 | 1:44 PM

Manoj jarange LIVE : मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज राजगुरुनगर या ठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी लाखो मराठा बांधव उपस्थित आहे. १०० एकर जागेवर मनोज जरांगे पाटील यांची ही सभा होत आहे, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहेत.

Manoj Jarange patil sabha Live : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्याच्या राजगुरुनगर या ठिकाणी जाहीर सभा सुरु आहे. या सभेसाठी लाखो मराठा बांधव उपस्थित आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांग पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असं ही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. १०० एकर जागेवर मनोज जरांगे पाटील यांची ही सभा होत आहे. शांततेचं युद्ध सरकारला पेलणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा बांधव कावळे यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभरात जावून मराठा बांधवांना भेटत आहे. आपल्यावर अन्याय करायला सरकार सोडून कोणीच तयार नाही. येथे येवून बघा नजर देखील पुरणार नाही. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांचं बलिदान वाया जावू देणार नाही. सरकारच्या भूमिकेमुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे सरकार याला जबाबदार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 20, 2023 01:44 PM
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अखेर अटक, तोंड कोणाची बंद? देवेंद्र फडणवीस अन् सुषमा अंधारे आमने-सामने
Devendra Fadnavis : राज्यातील कंत्राटी भरतीचे दोषी कोण? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…