Maratha Reservation : … तर मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार. या दौऱ्यापूर्वी त्यांनी पुन्हा सरकारला दिला इशारा. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत एक केला गौप्यस्फोट. २४ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचे जरांगे पाटील म्हणताय.
मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी त्यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत एक गौप्यस्फोटही केला. २४ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचे जरांगे पाटील म्हणताय. २ नोव्हेंबरला सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी या गावात जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यात मंत्री धनंजय मुंडे ही होते आणि मुंडे जरांगे यांच्याकडे मुदत वाढवून मागत होते. यावेळी कानात झालेलं बोलणं मनोज जरांगे पाटील यांनी सार्वजनिक केलंय. धनंजय मुंडे हे जरांगे यांच्या मागण्यांवरून त्यांना आश्वस्त करत होते. दरम्यान, १५ नोव्हेंबरपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. १५ ते २३ नोव्हेंबर असा जरांगेंचा संवाद दौरा असणार आहे.